अनपेक्षित भेट

“अरे तुझे सगळेच मित्र high school ला जातील, पुढच्या वर्गात जातील आणि तु जायचं नाही असं म्हणतोय. सगळे पुढे चालले जातील आणि तु मागे राहशील. मागेच रहायचयं का तुला?” बाबा माझी समजुत घालत होते. ४थी झाल्यावर पुढच्या शिक्षणासाठी दुसऱ्या शाळेत जावं लागणार हे समजताच माझ्या बालमनाची धांदल उडाली होती. भीती वाटत होती. बरेच मित्र-मैत्रिणी सुटणार होते. हा सगळा चलपट डोळ्यांपुढुन गेला, जेव्हा मी Whatsapp वरती नवीन group तयार करत होतो. यामध्ये निरंजन आणि शुभम ला add केलं. शुभमने निहाला आणि मग निहा ने पुजाला add केलं. पुढे निहा आणि पुजाने नाव वगैरे आठवुन बऱ्याच जणांना add करत रंगभुमी सांभाळली. वास्तविक, या दोघींमुळे बरेच नवीन नावं त्या group मध्ये आली. व्याप वाढला. मग सुरू झाली ती बडबड. ही बडबड चालु असताना माझ्या मनात एक विचार आला. जर मला “. …….हा माझ्या बालपणीच्या मित्राकडे येतो” असं माझ्या मित्राच बोलणं कानावर आलं नसतं तर?
दोनं दिवसापुर्वीची गोष्ट होती. Thopte Lawns ला गेलो होतो. निमित्त होतं स्वागत समारंभाचं. Class असल्यामुळे संध्याकाळी class वरुन घरी आलो आणि लगेच समारंभात गेलो. तिथे शुभम भेटला. आम्ही दोघही जेवन घेण्यासाठी एका counter वर गेलो. तिथेच माझ्या घराशेजारचा मित्र रोहन आला. हे दोघं एकमेकांना ओळखत होते. जेवन घेतलं आणि मित्रांबद्दलच्याच गोष्टी सुरू झाल्या. रोहन म्हणाला, “माझा मित्र एकदा मला त्याच्या मित्रांची नाव सांगत होता. तो जी नाव घेत होता, मी त्या सगळ्यांनाच ओळखत होतो. नंतर त्यानं फोटो दाखवुन ‘याला ओळखतोस का’ अस मला विचारलं. तो फोटो बघुन मी त्याला म्हणालो  की अरे हा तर माझ्या बालपणीच्या मित्राकडे येत असतो.” ‘बालपणीचा मित्र’ हे ऐकल्यावर माझ मन वेगळ्याच विचारात पडलं. बोलणं बराच वेळ चाललं. रोहनचं जेवन झाल्यावर तो निघुन गेला. माझ मन मात्र विचारातच होतं.

“बालपणीचे कितीतरी मित्र भेटत नाहीत ना? सगळे पसरले” मी जेवत असलेल्या शुभमला म्हणालो.

“हो ना! भेटच होत नाही. अरे तुला निहा गायकवाड लक्षात आहे का?” शुभमने विचारलं.

मी म्हणालो, “हो. मनोजच्या क्लासला पाहिलयं बहुतेक तिला.”

“अरे माझ्या collegeला आहे ती. शेवटी शेवटी बोलु लागलो आम्ही” शुभम म्हणाला.

“अजुन कोणी आहे का contact मध्ये?” मी विचारलं

“का रे?” शुभमचा प्रश्न.

“आपला लहानपणीच्या मित्रांचा group असलाच पाहिजे” मी म्हणालो.

Vibrate झालेल्या फोनवर माझ लक्ष गेलं. अजुन काहीजण group मध्ये add केले गेले होते.बरेच messages येत होते. बालपणी नवीन शाळेत जाताना मित्र-मैत्रिणी सुटतील याची भीती वाटणारा मी, आज मात्र बालपणीच्या मित्र-मैत्रिणींच्या अनपेक्षित भेटीने आनंदीत झालो होतो!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: