पहिला दिवस

डिसेंबरची २२ तारीख होती. सकाळी लवकरचं उठलो होतो. पुर्वेकडे रंगांची ऊधळण करत नवीन दिवसाचं स्वागत करण्यात निसर्ग मग्न होता. पक्षांचा किलबिलाट, थंड हवा आणि मानवी हस्तक्षेप नसणारी शांतता यामुळे वातावरण अल्हाददायक वाटतं होतं. थोडावेळ बाहेरच निवांत ऊभं राहुन या वातावरणाचा आनंद घ्यायचा ठरवलं. काही क्षण जाऊ दिले आणि मग दिवसाची कामं करायला सुरवात केली.

सगळं आवरलं होतं. आईचा आशिर्वाद घेतला आणि गाडी सुरु करुन ८.४५ ला टाटा मोटर्सकडे रवाना झालो. एक वर्षानंतर पुन्हा एकदा त्याच कंपनीत चाललो होतो. इंन्टर्नशिपचा तो माझा पहिला दिवस होता. साधारण ९.०० वाजता मी पोहोचलो. गाडी लावली आणि गेटपास घेऊन HR office च्या पहिल्या मजल्यावर गेलो. Office मध्ये न जाता वऱ्हांड्यातच शुभमची वाट बघत थांबलो.

घड्याळीत ९.२५ झाले होते जेव्हा मी शुभमला कुठं यायचयं ते फोनवर सांगीतलं. फोन ठेवताच बुटांचा आवाज आला. डाव्या बाजुने काही जण माझ्या दिशेने येताना दिसले. पाहताना सगळ्यात आधी लक्ष मुलीकडे गेलं (हा निव्वळ योगायोग होता). तिच्याबरोबर दोन मुलं चालत होती. आणि या तिघांच्या पुढे एक मुलगा चालत होता. सगळे माझ्याच वयाचे वाटत होते. Military च्या एखाद्या formation मध्ये चालणारं हे बटालीयन जवळच्याच Talent Acquisition office मध्ये घुसलं. मी तर्क लावला की ते चौघजणं ट्रेनी असतील. थोडावेळ थांबल्यानंतर मीही त्या office मध्ये गेलो. तिथे एकाला “निखिल सर कुठे भेटतील?” असा प्रश्न विचारला. त्याने एका दिशेला हात दाखवला. तिकडे गेल्यावर समजलं की बटालीयनमध्ये पुढे चालणाऱ्या त्या मुलाला “सर” असं म्हणावं लागणार. तो त्या तिघांना Form देत होता. Confirm करण्यासाठी “निखिल सर?” असं प्रश्नार्थी स्वरात विचारलं. त्यानं माझ्याकडे पाहिलं. मी Formal प्राण्यासारखं “Good morning, I’m Gaurav.” असं म्हणालो. त्यानेही “Good morning” म्हणुन मला बसायला सांगितलं. तेवढ्यात माझा मित्र शुभम आला. निखिल मला form देत शुभमला म्हणाला, “शुभम तुला दुसऱ्या office मध्ये बसायचयं, तु चल माझ्याबरोबर.” आणि ते दोघं निघुन गेले.

आम्ही चौघं Visitor’s Lounge मध्ये मोठ्या टेबलासमोर खुर्च्यांवर बसलो होतो. Dining table वरती Head of the family ची जी जागा असते त्याच खुर्चीत मी इथे बसलो होतो. माझ्या एका बाजुला दोन आणि दुसऱ्या बाजुला एक असे तिघं जणं बसले होते. काही क्षण असेच गेले. मग नावं विचारण्यापासुन सुरू झालेलं आमचं बोलणं थेट निखिल आल्यावर थांबलं. आम्ही भरलेले form तो पाहत होता. तेवढ्यात मला “Good morning” असं ऐकु आलं. माझ्या डाव्या बाजुला सावळा वर्ण असलेला, आमच्याच वयाचा असणारा मुलगा उभा होता. माझ्या कानाजवळचे Neurons पटकन हा संदेश घेऊन मेंदुकडे पळत गेले आणि तिथुन Reply घेऊन तडक त्यांनी Voice Department गाठलं. “Good Morning” असं मी म्हणालो आणि माझा form पाहु लागलो. ह्यानं लगेच त्याचा form पुढे केला आणि मला म्हणाला, “सर form”. मी पुर्ण चक्रावलो. मी सर थोडीच होतो! भान ठेवत निखिलकडे वळालो आणि म्हणालो, “सर बहुतेक याचं तुमच्याकडे काम आहे”. तोपर्यंत अर्ध Visitor’s Lounge हसु लागलं होतं. त्या मुलाला काय झालं ते समजलं. त्याने लगेचचं तो form निखिलला दिला आणि एका खुर्चीत जाऊन बसला. तोपर्यंत मी आणि निखिल पण हसु लागलो. नंतर निखिल निघुन गेला. थोड्या वेळाने Visitor’s Lounge शांत झालं. आम्ही त्याच्याशी बोललो, नाव वगैरे विचारलं. पुढचा वेळ असाच निघुन गेला.

थोड्यावेळाने निखिल आला. सगळ्यांना Departments allocate झाले होते. त्याने forms घेतले आणि बाकीच्यांना जायला सांगितलं. थोड्या वेळाने मलाही त्याने जायला सांगीतलं. मी तिथुन निघालो आणि Commercial Vehicle Business Unit च्या Engine Department Head ला भेटलो. त्यांनी मला एका department ला allocate केलं. तिथुन लगेचचं मी माझ्या department ला गेलो. तिथे पोहोचल्यावर मी office मध्ये माझ्या Mentor ला भेटलो. त्या पहिल्या भेटीतच मला समजलं की येणारे सहा महिने हे नक्कीच enthusiastic ठरणार होते.

सुर्य मावळला होता. तांबड्या आणि गुलाबी रंगांच्या सुंदर छटा पश्चिमेला दिसत होत्या. जेवढ्या उत्साहात निसर्गाने त्या दिवसाचं स्वागत केलं होतं तेवढ्याच उत्साहात तो त्या दिवसाचा निरोपही घेत होता. मीही त्या दिवसाचा निरोप घेतला.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: