एक भेट – १३ वर्षांनंतरची

सकाळी लवकरच जाग आली. सुर्याची कोमळ किरणे खिडकीतुन डोकावत होती. आकाश अगदी निरभ्र होतं. ऐन पावसाळ्यात असं आकाश बऱ्याच दिवसानंतर बघायला मिळालं होतं. मी त्या मोहुन टाकणाऱ्या निळ्या आकाशाकडे बराच वेळ बघत बसलो. सकाळचं ते दृश्य खरंच नयनरम्य होतं. आवरायला जाण्याआधी पावसाची चिन्हे शोधायला एकवेळ आकाशावर दुरपर्यंत नजर फिरवली. कोठेच ढग दिसलेे नाहीत. मनाला समाधान वाटलं आणि प्रसन्न सुद्धा. वातावरण दिवसभर तसंच रहावं असं वाटत होतं. कारण २७ तारखेचा रविवारचा तो दिवस महत्वाचा होता. तब्बल १३ वर्षानंतर शाळेतले मित्रमैत्रिणी त्यादिवशी भेटणार होते!

१०:२५ ला निरंजनच्या घराकडे रवाना झालो. किरणचा ती पोहोचल्याचा फोन आधीच येऊन गेला होता. त्यामुळे शाळेवर पोहोचलो तेव्हा किरण आमची वाट पाहतच उभी होती. योगेशही पोहोचला होता.थोड्यावेळाने, जंगलात तलावाकाठी पाणी प्यायला वन्यजीव जमतात तसेच हळुहळु नेहा, किरण, निहा, आकाश, मुंजरीन, स्नेहल,चैताली, अक्षय, गणेश, अक्षय, सौरभ, आश्विन, आणि अभिषेक ही मंडळी शाळेजवळ जमली. बऱ्याच वर्षांनंतर भेट होत असल्याने चेहरे ओळखणं बऱ्याच जणांना अवघड गेलं. “अरे तु कोण आहेस? तुला नाही ओळखलं” सगळ्याच मुलींचा निरंजनसाठीचा हा प्रश्न होता. निरंजनसाठी मला त्यादिवशी फारच सहानुभूति वाटली. पुढे मग कोण काय करतयं, कोण कुठे राहतयं, वगैरे वगैरे गोष्टींवर चर्चा रंगली.

बऱ्याच आठवणी ताज्या झाल्या. कोणी शिक्षकांचा मार खाल्लेलं, तर कोणी मैत्रीतील भांडणं, कोणी gatheringच्या तर कोणी tripच्या आठवणी सांगु लागलं.

“मला लहानपणी गुणाकार येत नव्हता. प्रत्येकवेळी चुकत होतं. तेव्हा कुदळेबाईंनी माझे कान जोरात ओढले होते आणि मारलं पण होतं” निहा म्हणाली.

“मारायच्या बाबतीत सांगायच तर झोपेबाई! त्या खुप मारायच्या राव” किरण म्हणाली.

“आम्ही तर ‘गेली माझी सख्खी बायको गेली’ या गाण्यावरच्या dance मुळे famous झालो होतो. अरे ३ वेळा once more झालं होतं. खुप मजा आली होती तेव्हा” आकाश आणि किरण म्हणाले.

“मी तर trip cancle केली होती दुसरीत असताना. बागेत पडलो आणि डोक्याला लागलं होतं. सगळ्यांना परत घरी आणलं होतं माझ्यामुळे. नंतर शाळाच सोडुन दिली मी” योगेश म्हणाला.

माझ्याही मनात आठवणींचा ऊद्रेग झाला. कधी मित्राबरोबरची लिहिण्याची शर्यत, तर कधी मार्कांची. कधी दर शनिवारी मैदानावर मातीत पुल वगैरे बनवणारे आम्ही, तर कधी कराटेचे धडे. कधी प्रत्येक वेळेला पुर्ण असलेला गृहपाठ, तर कधी वर्गात मस्ती. कधी चुक नसतानासुद्धा मुलींमध्ये बसण्याची शिक्षा, तर कधी activityसाठी कपडा आणला नाही म्हणुन हातावर छडी. कधी लांबलचक चालणारे scholarshipचे तास, तर कधी तासनतास dance practice, मैदानावर खेळ. कधी पकडापकडी, झट-पट तर कधी लिंबुचमचा, तिन पायाची शर्यत, पोत्यातील ऊड्या. कधी माझा डबा, तर कधी मित्रांचा. कधी कट्टी  तर कधी बट्टी. कधी दुपारची निवांत शाळा, तर कधी सकाळी थंडीतली शाळा. कधी दहिहंडी, दांडिया तर कधी रक्षाबंधनचं celebration. ते पहिलं शाईचं पेन, आणि ती पहिली single ruled वही. अशा कितीतरी सोनेरी क्षणांचे साथीदार असणाऱ्या त्या शाळेच्या भिंती आजही तिथे होत्या. सगळं तसच होत फक्त वेळ बदलली होती. 

काही वेळानंतर आम्ही बाहेर येऊन थांबलो. सहजच लक्ष शाळेसमोरच्या मोकळ्या रस्त्यावर गेलं जिथं आम्ही लहानपणी खेळ खेळायचो. आठवणींच्या एका कप्प्यातुन हळुवार ‘…माझ्या मामाचं पत्र हरवलं…’ असा मनात आवाज आला. पण निहाच्या बोलण्यामुळे माझ तिच्याकडे लक्ष गेलं. “अरे ती bag कशाला आणली आहेस? काय आहे त्या bag मध्ये?” निहाने विचारलं. “या गौरव ने सांगीतली होती आणायला. काहीच विशेष नाहीये bag मध्ये” निरंजन म्हणाला. “अरे पाणी पाहिजे असेल तिला” मी म्हणालो. ” आहे का पाणी? दे मग!” निहा म्हणाली.आमचं बोलण असच चालु राहीलं. पण मला थोडी सुद्धा कल्पना नव्हती की या भेटीमुळे एक अनपेक्षित प्रवास घडणार होता.

6 thoughts on “एक भेट – १३ वर्षांनंतरची

Add yours

  1. Damm why the hell did you became engineer?
    Dude you got potential to become a writer ✌️

    Beautifull lines, perfect description of that day👌

    Great work👍

    Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: