कुने फॉल्स – एका अनोळखी वाटेवरचा प्रवास (भाग – १)

“ठरलं तर मग! जागा चांगली असेल तर जाऊ तिथेच.” चैतन्य म्हणाला.

“चांगली आहे जागा. मित्र जाऊन आलाय माझा.” मी म्हणालो.

“आणि नाहीच आवडली जागा तर सरळ पवना धरणाकडे जाऊ आणि मोकळी जागा बघुन क्रिकेट खेळु.” मयुरने सुचवलं.

           जागा होती खंडाळ्याजवळची कुने फॉल्स. खरतर आमच्यापैकी कोणीच तिथे आधी गेलं नव्हतं. माझ्या एका मित्राने मला या जागेबद्दल सांगीतलं होतं. त्याने मला कुने फॉल्स चे काही photo दाखवले. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या त्या जागेचे photo पाहताचक्षणी मला ती जागा फार आवडली. म्हणुनच आमचा tripचा plan ठरत होता तेव्हा मी ही जागा सुचवली आणि सर्वांची त्याला संमती मिळली. एखादा plan बनल्यावर येणारे अडथळे सगळ्यांनी मिळुन सोडवले व ४ सप्टेंबरच्या सोमवारी जायचं ठरवलं. यामुळे बऱ्याच महिन्यांनंतर आमच्या भेटीचा जुळून येणारा योग मला स्पष्ट दिसु लागला. स्वातीने तर संपुर्ण दिवसाचा दिनक्रमच बनवला होता. सकाळी कितीला निघायच, कोणाला कुठून pick करायच, कोणी काय घेऊन यायच अस सगळ होतं त्यात आणि मग सगळ्यांनी त्यानुसार तयारी केली होती.

          जायच्या दिवसाची पहाट झाली. माझं सर्व आवरुन झाल्यावर मी मयुरला फोन केला.

” बोल ना भावा”

“मयुर तुम्हाला किती वेळ लागणार आहे पोहोचायला?”

“हे काय १५-२० मिनीटात पोहचु आम्ही म्हणजे ९:३० होतील.”

चैतन्य आणि मयुर पुण्यातुन येणार होते. आणि तसच येताना स्वाती, स्मिता व चित्रांशला pick करुन निसर्ग hotel गाठणार होते. बेत होता सकाळी पिंपरीतल्या ‘निसर्ग’वर मिसळ खायचा. आणि मग तिथुनच पुढच्या प्रवासाला सुरूवात करायची होती. मी आणि शुभम जवळचं राहत होतो म्हणुन direct ‘निसर्ग’वर जायचं ठरवलं होतं.

          ठरल्याप्रमाणे मी आणि शुभम ‘निसर्ग’वर पोहोचलो. बाकीच्यांना यायला अजुन अवकाश होता. त्यामुळे आणलेल्या cold drinkचे sip घेत घेत मी आणि शुभमने वेळ घालवायचा प्रयत्न केला. थोड्यावेळानंतर एक Scorpio आमच्या पुढे येऊन थांबली. चैतन्य, मयुर, स्वाती, स्मिता आणि चित्रांश गाडीतुन उतरले. सगळ्यांची व्यवस्थित भेट घेतली आणि hotelमध्ये गेलो. गर्दी जरा जास्तच होती म्हणुन थोडावेळ थांबल्यानंतर जागा मिळाली. आम्ही सगळे settle झाल्यावर गप्पा सुरू झाल्या. ‘मयऱ्या’, ‘मोटी’, ‘तैच्या’, ‘भाई’, ‘फाटा’, ‘union’ असले ओळखीचे शब्द कानावर पडले. अचानक टेबलावर ठेवलेल्या cold drink च्या bottle कडे बघुन स्वाती मला आणि शुभमला ऊद्देशून म्हणाली, ” सालों, तुम दोनो ने तो पुरी bottle यहींपे खतम कर दी! अब जाते वक्त एक और bottle कहींपर ले लेंगे।”

“अग काही गरज नाहीये. अजुन दोन bottle आहेत माझ्या bag मध्ये.” मी तिला बोललो.

“अच्छा ऐसा क्या! तब ठीक है!” ती म्हणाली.

आमच्या गप्पा चालु असताना आमची ‘मिसळ’ची order आली.

“poster अच्छा है ना?” स्वातीने सर्वांचं लक्ष भिंतीवर लावलेल्या एका poster कडे वेधलं. तो poster म्हणजे उंचावरून पडणाऱ्या धबधब्याचं मोठं चित्र होतं.

“कुने फॉल्स” चैतन्य म्हणाला. सर्वजण हसले.

“ऐका, मी काय म्हणतो, इथेच टेबलावर poster जवळ ऊभं राहून photo काढु. कशाला एवढ्या लांब जायचं?” मिश्कीलपणे मयुर म्हणाला.

“चालेल ना. तु ऊभा रहा मी bottle मधलं पाणी ऊडवतो. खरं खरं वाटेल” तेवढ्याच मिश्कीलपणे शुभमने ‘वाढीव’ कल्पना सुचवली. सर्वजण पुन्हा हसले.

          थोड्यावेळानंतर सगळ्यांच खाऊन झालं. hotel मधुन बाहेर आल्यावर आम्ही गाडीत बसलो आणि आमचा प्रवास सुरू केला. गाडीत गप्पा कमी आणि मस्तीच जास्त चालु होती. हे गाणं लाव, ते गाणं लाव, हे गाणं बदल, ते गाणं राहु दे असा प्रकार चालु होता. याला कंटाळलेल्या चैतन्यने बऱ्याच वेळा auxiliary cable काढण्याचा आणि नाईलाजाने परत लावण्याचा पराक्रम बराच वेळ चालवला. थोड्यावेळानंतर मयुरने बाहेर दिसणाऱ्या लोकांना ‘hi, hello’ करायचा प्रकार चालु केला. असे अनेक प्रकार नंतर चालले. पण यामुळे अर्धा प्रवास कधी संपला ते कळलं सुद्धा नाही.

          सुर्य आता डोक्यावर आला होता. Google Map follow करत आम्ही आमच्या destination वर पोहोचणारच होतो. थोडावेळ प्रवास केला आणि ‘आपण पोहोचलात’ अस google map बोलला. अर्थात, आम्ही जिथं होतो तिथे रस्त्याच्या दोन्ही बाजुला झुडपं होती. पाण्याचा लवलेशसुद्धा नव्हता, डोंगरातुन होणारा फॉल्स तर लांबच राहीला. दुसऱ्यांना रस्ता दाखवणारा आज स्वत:च चुकला होता. शेवटी आम्ही कोणाला तरी विचारायचं ठरवलं.

“काका कुने फॉल्स इकडेच आहे का?” चैतन्याने एका गृहस्थाला विचारलं.

“नाही, ते तर मागेच राहीलं. इकडे पुढे काहीचं नाहीये.” ते गृहस्थ म्हणाले.

चैतन्य ने U – turn घेतला. रस्त्याला वर्दळ तशी कमीच होती. त्यामुळे कोणाला तरी परत विचारण्यासाठी थोडावेळ तिथेच थांबलो.

“अरे काय करायच? खंडाळा जवळ आहे इथुन. जाता येईल आपल्याला. बोला काय करायच?” चैतन्य म्हणाला. (क्रमशः)

 

2 thoughts on “कुने फॉल्स – एका अनोळखी वाटेवरचा प्रवास (भाग – १)

Add yours

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: