अचानक साखर झोपेतून जाग आली. ‘किती वाजले असतील?’ ‘उशीर तर झाला नसेल ना?’ या प्रश्नांनी काही क्षणांकरता डोक्यात गोंधळचं करून टाकला होता. पटकन वेळ पाहिली. आठ वाजून गेले होते. साखर झोपेतलं स्वप्न अर्धवट बाजूला ठेवलं आणि पटकन आवरायला सुरुवात केली.
५ नोव्हेंबरचा रविवार मिसळचा बेत सोबत घेऊनच उजाडला. नेहमीप्रमाणे आम्ही तर, म्हणजेच निरंजन, किरण, निहा, आकाश आणि मी भेटणारच होतो, पण तेजश्री मात्र तेरा वर्षांनी भेटणार होती. तेजश्री म्हणजे माझी लहानपणीची competitor. हो! आणि ती मला competitor म्हणुनच लक्षात आहे. जेव्हापासुन ती आमच्या शाळेत आली तेव्हापासुन प्रत्येक चाचणी परीक्षेत वगैरे तिला माझ्यापेक्षा जास्त मार्क्स असायचे. तेव्हापासुन मी तिला competitor समजु लागलो! मग लहानपणी लागणाऱ्या शर्यतींपैकी तिच्याशी मार्कांची शर्यत लागायची असं म्हटलं तरी ते वावग ठरणार नाही. (अर्थात तिच्या नकळत!)
सगळं आवरून झालं तेवढ्यात निहाचा फोन येऊन गेला. सर्वजण सोबत जायचं असं ठरलं होतं. त्यामुळे ती आणि तेजश्री ठरलेल्या ठिकाणी पोहोचले हे सांगायला तिने फोन केला होता. किरणचा सुद्धा तो निघाला असल्याचा फोन येऊन गेला होता. निरंजन आणि मी सोबत जाणार होतो त्यामुळे तो माझ्या घराकडे रवाना झाला होता. १० च्या सुमारास सर्वजण M. M. college जवळ भेटलो आणि तिथूनच ‘मिसळ’साठी रवाना झालो. रस्ता तसा ओळखीचाच होता. सलग तीन वर्ष याच रस्त्याने ये-जा केली होती. फरक एवढाच होता की तेव्हा कॉलेजसाठी जायचो पण त्या दिवशी मात्र एका निवांत मिसळला चाललो होतो. रस्त्यात ओळखीच्याच इमारती, शाळा, चौक मागे टाकत आम्ही जात होतो. साधारण पंधरा मिनीटानंतर आम्ही कॉलेजच्या रस्त्याला लागलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरपूर झाडं होती. त्यावर फुललेली गुलाबी-लाल रंगाची फुलं वाऱ्याच्या झुळुकेबरोबर ऐटीत डोलत होती.जणु लयबद्ध पद्धतीत माझ्या मित्र मैत्रिणींचं स्वागतच ते करत होते! मी मात्र थोडा nostalgic झालो होतो. कधी लेक्चरची गडबड, कधी सबमिशन चा गोंधळ, कधी प्रॅक्टिकलसाठी झालेला उशीर हे सगळं त्या रस्त्याने अनुभवलेलं होते. चार वर्षांचा एक छोटासा flashback डोळ्यांपुढून गेला. आज मात्र कोणतीच गडबड नव्हती ना कसला गोंधळ होता, होता फक्त निवांतपणा.
“अरे अजून किती लांब आहे?” किरणने विचारल.
“पोहोचतच आलोय. हे थोडं पुढे गेलं की उजव्या बाजूला आहे” मी म्हणालो.
पुढे काही मिनिटांच्या अंतरानंतर आम्ही पोहोचलो. गाड्या पार्क केल्या आणि हॉटेलमध्ये गेलो. माझ्यासाठी ही जागा काही नवीन नव्हती.
हॉटेल होतं ‘मयूर मिसळ’. हॉटेलमध्ये गेल्यावर चांगला spot बघून आम्ही स्थानापन्न झालो आणि मिसळची order दिली. तेजश्रीने तिच्याबरोबर काही पुस्तकं आणलेली मी पाहिली होती. न राहवून मी सहजच तिला विचारलं, “अग तु ऐवढी पुस्तकं का आणली आहेस? इथे अभ्यास करणार आहेस का?” डोक्यात backgroundला विचारांची process चालुच होती. ‘अजुन पण तशीच आहे वाटतं. competitor कुठली!’
“अरे नाही! ते मैत्रिणीचे books आहेत. जाताजाता द्यायचे आहेत म्हणून आणले आहेत मी” तेजश्री म्हणाली.
“अस आहे का!” मी म्हणालो.
“अरे introduce तर करुन दे ना! माझ्या कोणीच लक्षात नाहीये! चेहरे लक्षातचं येत नाहीयेत आता!” तेजश्री मला म्हणाली.
मग मिसळ खात खात एकमेकांची नावं, कोण काय करतयं अशी बडबड चालु झाली ती थेट मिसळ संपेपर्यंत चालली.
“चला ना बसू थोडावेळ निवांत कुठेतरी” हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर मी सुचवलं.
“रावेत bridge वर जाऊ.” निहा म्हणाली.
“अगं नको तिथं” मी लगेच react झालो. “निवांत जागा म्हणतोय मी.”
“चला मग PCCOE साईडला” निहा म्हणाली.
मग आम्ही सगळे तिथून निघालो आणि एक निवांत जागा शोधून बोलत बसलो. थोड्यावेळानंतर समोरच असलेल्या Coffee Shop मध्ये गेलो.
कॉफीची ऑर्डर दिली आणि किरणने विषय काढला,”अरे कुठे फिरायला जायचं का?”
“मी तर तयारच आहे” निहा म्हणाली.
“जवळच्या जवळ ट्रेकिंगला वगैरे जाऊ” आकाश म्हणाला.
“फक्त लगेच ठेवू नका, इंटरनल चालू आहे माझी” निरंजन म्हणाला.
“चालेल ना” मी पण म्हणालो.
“मला पण चालेल पण माझी या महिन्यात परीक्षा आहे” तेजश्री म्हणाली.
“माझी ११ डिसेंबर पर्यंत परीक्षा संपेल” निरंजनने सांगितलं.
“आणि माझी 17 डिसेंबर” निहाने सांगितलं.
“चालेल ना मग 17 तारखेनंतर जाऊ” किरणे सुचवलं.
कोल्ड कॉफी चे सिप घेत घेत त्या दुपारचा बराच वेळ असाच निवांत बोलण्यात घालवल्यानंतर निघायची तयारी झाली. मी, निरंजन, किरण आणि निहा कामानिमीत्त चिंचवडला जाणार होतो. सगळ्यांनी bikes काढल्या. तेवढ्यात तेजश्रीने मला विचारलं,
“गौरव तु येतोय ना? कारण मला रस्ता माहित नाहीये.”
“अग मी तर चिंचवडला चाललोय!” मी म्हणालो.
“मी तिकडेच चाललोय मी दाखवतो तिला रस्ता” आकाश म्हणाला.
“चालेल” अस म्हणत सगळे मार्गी लागले आणि अजून एक रविवार माझ्या आठवणींच्या कप्प्यात नकळत जमा झाला!
Leave a Reply