प्रसंग तसा फार जुना नाही. त्या दिवशी घरी पाहुणे येणार होते. त्यामुळे घरात तशी कामाची लगबगचं होती. सर्वजण कामात होते. मी पण कोथिंबीरी निवडत हातभार लावयचा प्रयत्न करत होतो. तेवढ्या दारावरची बेल वाजली. मी हॉल मधे बसलो होतो. निवडलेली कोथिंबीर किचनमधे ठेवायला गेलो. तोपर्यंत बाबांनी दरवाजा ऊघडला. पाहुणे आले. त्यांच्याबरोबर आली ती चार वर्षांची लहान मुलगी. परी तिचं नाव. घरात आल्या आल्या ‘दादा – दादा’ करत फिरु लागली.
नावाप्रमाणेच स्वच्छंद आणि निर्भिड. कोणी तिला तिचं नाव विचारेल याची वाट न पाहता “माझ नाव परी आहे” अस घरात सांगुन टाकलं आणि पुन्हा तिच्या जगात रमली. पळत, ऊड्या मारत ईकडे तिकडे घरात वावरु लागली. घर फिरुन झाल्यावर बाल्कनीत गेली. तिथुन तिने मला आवाज दिला.
“दादा ईकडे ये ना!”
“काय गं काय झालं?” मी तिला विचारलं. ती बाल्कनीत ठेवलेल्या cycle वर बसली होती.
“दादा हे काय आहे? आणि ही बटणं कशाची आहेत?”
आता, तो display होता ज्यावर वेगवेगळे parameters दिसतात आणि ती बटणं म्हणजे navigation panel होतं. जमेल तेवढ्या सोप्या शब्दांत तिला ते समजवुन सांगीतलं. तेवढ्यात तिचा पुढचा प्रश्न “दादा ही cycle पुढे का जात नाहीये?” मुळात ती सायकल म्हणजे घरी व्यायाम करण्याची सायकल होती. तिला चाकं वगैरे नव्हती त्यामुळे ती सायकल जागची हालायचा प्रश्नच नव्हता. पण लहान मुलांची curiosity! मी याही प्रश्नाच ऊत्तर तिला दिलं. पुढचा प्रश्न “दादा तु कधी आमच्या गावाला आलाय का?”
“हो आलोय ना. मी पण तेव्हा तुझ्याऐवढाच लहान होतो.”
“मी पहिल्यांदाच आलीये ना तुमच्या गावाला?”
“हो.”
“मी रोज शाळेत जाते. तुझ्या गावाला पण आहे का शाळा?”
“आहेना! पण आमच्या गावाच्या शाळेत जायला तुला इथेच रहावं लागेल”
तेवढ्यात सायकल वरुन खाली उतरुन बाल्कनीतुन इकडे तिकडे पाहु लागली.
“ती दीदी शाळेत चाललीये ना! बाय दीदी सी यु” असं त्या शाळेत जाणाऱ्या अनोळखी मुलीकडे पाहुन म्हणाली.
थोड्या वेळाने आम्ही वरच्या रुम मध्ये गेलो. रूम बघताचं “अरे दादा किती मस्त रूम आहे ही! मला खुप आवडली” असं एकदम आनंदाने म्हणाली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे होते. त्यात कोणत्याही प्रकारचा दिखावा किंवा आव नव्हता. इथेही ‘हे काय, ते काय’ अशा तिच्या प्रश्नांची उत्तरं त्या दिवशी द्यायचा प्रयत्न केला.
लहान मुलांमध्ये मुळात कुतूहल असतचं! त्यांच्या सवडी नुसार ते माहीती जाणुन घ्यायचा प्रयत्न करतही असतात. कधी घरात तर कधी खेळताना! दुर्दैव म्हणजे लहान मुलं खेळत असले की कधीकधी मी पाहतो, लोकं म्हणतात ‘खेळु नका ओरडु नका.’ लहान मुल ओरडणार नाहीत तर काय म्हातारी लोकं ओरडणार, खेळणार का? कधीकधी ‘तु मुलगी आहेस त्यामुळे एवढा आगाउपणा करणं चांगल नाही’ असंही ऐकलयं. पण आज निर्भीड पणे प्रश्न विचारणारी, कुतूहल ठेवणारी आणि त्याची माहीती घ्यायला धडपडणारी, कदाचीत उद्या सामाजिक प्रश्न सोडवायलासुद्धा धडपड करेल! आज आरडाओरड करुन खेळणारे कदाचीत ऊद्या जागतिक स्तरावर शांतते साठी प्रयत्न करतील!
बाकी काहीही असो पण प्रत्येकासाठी त्याच बालपण म्हणजे आयुष्यभराची गोड शिदोरीच असते. अशावेळी संत तुकारामांनी रचलेल्या ओळी आठवतात,
लहानपण देगा देवा | मुंगी साखरेचा रवा ||
ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार ||
परी सारखाच सुंदर आहे़…….👌
LikeLiked by 1 person
धन्यवाद☺
LikeLike
Bhari👌👌
LikeLiked by 1 person
Thanks🤘
LikeLike