मनाला जरा निवांत वेळ मिळाला की ते कसं कुठेही पळत सुटतं. अगदी highly developed network असल्यामुळे कसलाच अडथळा येत नाही. निमित्त होतं रविवारचं. निवांत बसलो होतो. सहजच मनात सध्याच्या माझ्या दिनक्रमाचा विचार आला. त्याच अस आहे, मी काही महिन्यांपुर्वीच Tata Motors मध्ये रुजू झालोय. त्यामुळे ८ ते ५ job हा ठरलेला दिनक्रम. रुजू झाल्यावर लगेचचं ४० वर्षे तिथेच job केलेल्या एका वरीष्ठाचा send off सुद्धा अनुभवला. माझा न समजुन येणारा निघुन जाणारा वेळ आणि सध्याचा दिनक्रम बघता वयाची ४० वर्षे ही सगळी लोकं असा दिनक्रम ठेउन कशी काय काढतात याचचं मला आश्चर्य वाटतं. असो. पण या गोष्टीचा विचार केला की आयुष्यात मी काय करतोय आणि मला कुठे पोहोचायचंय याचं भान राहतं. यामध्ये एकतर motivation सापडतं नाहीतर नाईलाजाने जे आहे तेच चालु ठेऊन ‘डबकं’ बनुन आयुष्य काढावं लागतं.
‘अनुभव’, मग तो professional job चा असो किंवा दुसरा कुठला, पण तो असणं, तो घेणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण यातुन बऱ्याच गोष्टींचा ‘साक्षात्कार’ होतो. कुठेतरी मी असं वाचलं होतं की ‘तुम्हाला तुमचं आयुष्य डबक्यासारखं बनवायचयं की निखळ वाहणाऱ्या झऱ्या सारखं हे तुम्हीच ठरवा’. खरतर यात न समजण्यासारख काहीच नसावं. पण एखादी गोष्ट समजणं आणि एखाद्या गोष्टीचा अनुभव घेणं या दोन्ही गोष्टीत जमिन-आसमानाचा फरक आहे. वरचं वाक्य मला बऱ्याच वर्षांआधीच समजलं होतं, पण त्याचा अनुभव मी सध्या घेतोय किंवा घेतलाय. दिवसातले १० – ११ तास ज्यावेळी एखादी व्यक्ती office मध्ये घालवतो, त्यावेळेला त्याला उरलेल्या वेळेची किंमत समजते, त्याची जाणीव होते. आता, या वेळेत तो नेमकं काय करतो याचा direct संबंध ‘डबकं’ किंवा ‘झरा’ यांच्याशी आहे. एकतर काहीतरी जादा शिकावं नाहीतर जस चाललंय तसचं दिवस ढकलणं. खरतरं फक्त उरलेला वेळचं नव्हे तर संपुर्ण दिवसभराचा वेळ जरी म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. आपण आपलं काम कसं करतो, त्यासाठी किती नवीन गोष्टी शिकायचा प्रयत्न करतो, आपण आपल्या कामाबद्दल कसा विचार करतो याही गोष्टी आपल्या growth साठी तितक्याच महत्वाच्या असतात.
डबकं म्हणजे काय तर स्वत:हुन स्वत:च्या आयुष्याची वाढ खुंटवणे, थांबवणे. पण याऊलट, ‘मी मला दिलेलं काम अजुन चांगलं करु शकतो का, ते काम करायचं वेगळा पण चांगला मार्ग असु शकतो का’, अस विचार करणं देखिल वाढीसाठी मदत करते. आपल्या कामात थोडं extra mile जाणं, काहीतरी शिकणं, अनुभवणं, छंद जपणं यातच ‘वाढ’ लपलेली असते असं मला वाटतं. आणि असं जिवन जगणं म्हणजेच निखळ वाहणाऱ्या झऱ्यासारख जिवन जगणं! आपण सगळेच मुळात असं ‘झरा’ बनु शकतो, प्रश्न फक्त आपल्या निर्णयाचा राहतो, डबकं बनायचं की झरा!
Very nice gaurav
Thanks for sharing your experience & motivating us.
Best of luck for your very bright future
LikeLiked by 1 person
Thanks you so much sudesh
LikeLike