‘१०वी फ’ ची ट्रिप

“चला कुठेतरी फेरफटका मारून येऊ. दहावी फ ची एक तरी ट्रिप काढूना यार” मी उसाच्या रसाचा ग्लास टेबलावर ठेवत बोललो.

“चालेल ना अरे मी तर कधी पासून म्हणतोय जाऊ कुठेतरी. मी ट्रेकिंगबद्दल पण बोललो होतो. कोणीच तयार नाही झालं” किरणच्या बोलण्याने मला त्याची किव आली. हा बिचारा 2017 च्या सप्टेंबर पासून trekking trekking करत होता पण तसं काही झालं नाही.

“माझी exam होती रे. म्हणुन नाही जमलं मला. मी आधीच सांगीतलं होतं.” निरंजन म्हणाला.

“अरे मी तर तयारच होतो. आले काही जणांना problems. बरं ते असु देत. १०वी फ ची ट्रिप plan करू. कोणी नसलं तरी आपण जाऊन येऊ. ताम्हिणीचा plan success झालाच की! आपण चौघचं तर होतो तेव्हा. आणि सगळ्यांचाच टाइमिंग बघत बसलं ना, तर ट्रिप कधीच काढता येणार नाही” माझ्या म्हणण्याला उरलेले तीनही डोकी agree झाले.

“चालेन ना, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये! काढू आपण ट्रिप” योगेश म्हणाला.

“काढा ट्रिप! मी तयारच आहे, फक्त माझी एक्झाम वगैरे असेल तर मला जमणार नाही. बाकी दिवस मी तयारच आहे” निरंजनने पण संमती दाखवली.

एव्हाना सगळ्यांचा रस पिऊन झाला होता. ट्रिपचा विषय आणि उसाच्या रसामुळे दीडतास बॅडमिंटन खेळाल्याचा थकवा कुठल्याकुठे निघून गेला.

“थांब मी लगेच ग्रुप वर टाकतो. जेवढे येतील तेवढे जाऊ” असं म्हणत योगेशने लगेचच ग्रुपवर ट्रिपचा मेसेज टाकला आणि ग्रुपचं नाव बदलून ‘दहावी फ चा हॉलिडे plan’ असा केला.

“कोणी असलं नसलं, तरी आपण चार जणं तयार आहोतच. आणि आपली मारुती 800 पण आहे. कोणी येत असेल तर चांगलंच आहे नाहीतर आपण जाऊन येऊ” किरण बाईक चालू करता करता म्हणाला.

“चालेल. चला भेटू sundayला” असं म्हणत योगेश निघाला.

‘Bye’ म्हणत सगळ्यांनीच घरच्या दिशेने वाटचाल केली. त्या रात्री बराच वेळ ट्रिपच्या excitment मुळे झोपचं लागली नाही.

***

ट्रिपच्या मेसेजला मित्रांचा प्रतिसाद बघून जास्त मित्र येतील याची चिन्हे दिसू लागली.

‘अरे चालेल ना! मी तयार आहे. तुम्ही कधी पण काढा ट्रिप’ सचिनचा मेसेज.

‘मी पण तयार आहे’ परमवीर चा मेसेज.

‘चालेलना’ मयूरचा मेसेज.

‘मी Feb च्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये येईल. Timing manage झाला तर मी पण येईन ट्रिप ला’ सागर चा मेसेज, जो अहमदाबादला कामानिमित्त असतो.

जानेवारी जाऊन फेब्रुवारी उजाडला.

‘ट्रिपचं काय झालं योगेश?’ परमवीरचा मेसेज.

‘Hold वर आहे सागर साठी, ३ मार्च, ट्रिपचा दिवस. कुठं जायचय ते ठरवा’ योगेशचा मेसेज.

पण काही कारणास्तव, काही कारणास्तव कशाला! मला जमणार नव्हतं म्हणून मित्रांनी ट्रिप कॅन्सल केली! मित्रांनो क्षमस्व!

मार्च उजाडला.तिळातिळाने तापमान वाढत होत आणि हवेतला गारवा दिवसागणिक कमी होत होता.

योगेशने मेसेज टाकला, ’18 तारखेला जाऊ’

‘अरे पण पाडवा आहे 18 तारखेला’ मयुरने reply केला. योगेश म्हणाला, ‘मग ठीक आहे 25 ला जाऊ. कोण कोण येतय?’

फक्त मोजकेच मित्र रिप्लाय देत होते. बाकीचे मेसेज वाचून सोडून देत होते. त्यामुळे योगेश, सचिन आणि परमवीरचा पारा वाढला.

‘अरे ******, योगेश काय त्याच्या personal कामासाठी बोलतोय का? Cooperate करा सगळ्यांनी’ सचिनने ग्रुपमध्ये मेसेज टाकला. सोबत शिव्या सुद्धा.

‘अरे कोणाला अडचण असेल रिप्लाय द्यायला, तर सांगा! मी आणि योगेश पर्सनल invitation घेऊन येतो तुमच्या दारात, *****’ परमवीर पण भडकला.

न रहावुन योगेश ने पण चार शिव्या टाकुन मन शांत करुन घेतलं असावं. आणि बरोबरचं होत या तिघांचं! यायचं असेल तर ‘हो’ म्हणावं, नाहीतर ‘नाही’ म्हणुन समोरच्याचा मार्ग तरी मोकळा करावा!

सरतेशेवटी, जे येणार होते त्यांनी भेटुन पुढचा plan discuss करायचं ठरवलं.

***

मुंग्या साखरेजवळ गोळा होतात, तसेच आम्ही मित्रमंडळी ‘पवनेश्वर’ला गोळा झालो. इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर आम्ही मुद्द्यावर आलो.

“अरे पण काशिदच fix आहे ना?” परमवीरने विचारलं.

“काशिदच fix आहे. One day return” योगेश बोलला.

“beach चांगला आहे ना पण?” रोहीत ने विचारलं.

“हो रे चांगलाय. नाही आवडला तर आजूबाजूला भरपूर ऑप्शन्स आहेत, काही प्रॉब्लेम येणार नाही” योगेश म्हणाला. तेवढ्यात अनिकेत आला.

“काय रे! डायरेक्ट ऑफीसवरुन आलाय का?” मी विचारलं.

“काय सांगू! last moment ला काम सांगितलं त्या *****ने” त्याच्या बोलण्यावरून त्याचं frustration दिसून आलं.

मयुर आणि परमवीर ने ट्रॅव्हलरचा तपास केला होता. आम्ही जवळपास दहा अकरा जणं होतो म्हणून traveller आमच्यासाठी ऊत्तम पर्याय होता. मी ट्रिपसाठी सहजच एक डे-प्लान तयार केला होता.

०४:१५ – शाळेजवळ भेटणे

०४:३० – प्रवासाला सुरवात

०९:०० – काशिद

०९:४५ – नाश्ता वगैरे

१०:०० – नेत्रसुख

१२:०० – जेवण

१३:०० – जेवण

१६:०० – परतीचा प्रवास

२०:०० – शाळेवर पोहोचणे

२०:३० – डिनर

२१:३० – sleep

यामध्ये थोडा बदल झाला तो असा – रात्री एक वाजता प्रवासाला सुरवात करणे.

एव्हाणा ग्रुपचं नाव ‘ट्रिप टु काशिद’ असं झालं होतं. जायचा दिवस हळुहळू जवळ येत होता. माझं excitement वाढु लागलं.

***

समुद्रकिनारा! मला लहानपणी किनाऱ्यावर गेलेलं आठवत, पण तो काळ वेगळाच ना शेवटी! किती वेगळा अनुभव असेल ना? किनाऱ्यावरची वाळू, समोर अथांग पसरलेला समुद्र, किनाऱ्याला आवाहन करणाऱ्या लाटा, सगळा कसा वेगळा अनुभव असणार आहे! मी खूप एक्साइटेड झालो होतो. तेवढ्यात मला फोन आला.

“बोलना योगेश!”

“अरे मी दहा मिनिटात घ्यायला येतोय तुला. निरंजन आणि परमवीर आलेत ग्राउंडवर”

“चालेल ना!”

हॉलमधल्या घड्याळीने मंद आवाजात रात्रीच्या बाराचे ठोके दिले. माझ आवरून झालेलंच होतं. दहा-पंधरा मिनिटात योगेश आला.

“व्यवस्थित जा” आई – बाबा म्हणाले.

“हो” मी आणि योगेश दोघे उत्तरलो.

शाळेच्या ग्राउंडवर आलो तेव्हा निरंजन व शुभम थांबले होते. हळू हळू सगळेच आले. ठरल्याप्रमाणे रात्री एक वाजता आमची गाडी आली. सगळेजण गाडीत बसलो आणि बाप्पाचं नाव घेत आमच्या पहिल्या वहिल्या १०वी फ च्या ट्रिपच्या प्रवासाची सुरुवात केली!

(क्रमश:)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: