तापीचा काठ

'पूर्वेकडुन पश्चिमेकडे वाहणारी नदी' अशी आमच्या तापी ची ओळखं. तिचं खोरं आणि पात्र तसं मला फारचं मोठं वाटतं. काही ठिकाणी रुंद तर काही ठिकाणी खोल. पण समुद्रासारखं अथांग वाटणारं! मध्यप्रदेशात होणारा उगम ते महाराष्ट्रातून गुजरातेत अरबी समुद्रात एक होणारी ही नदी तिच्या प्रवासात बऱ्याच गावांचा कणा आणि आधार होते. आमचं गावही त्यातलंच एक. गावापासून काही... Continue Reading →

काशिदच्या किनाऱ्यावर

(दहावी फ ची ट्रिप पासुन पुढे)  “अडीच तीन तासात आपण पोहोचून जाऊ” ड्रायव्हर म्हणाला. म्हणजे पहाटे साडेचारला पोहोचून करायचं तरी काय हा प्रश्न मला पडला. “हळूहळू जाउद्या, आपल्याला घाई नाहीये” अभिजीत म्हणाला. सचिन पुढच्या सीटवर बसला होता. त्यानंतर मी, निरंजन, योगेश, शुभम आणि अभिजीत भाऊ.  शिवानंद, अमित, परमवीर, रोहित आणि अभिजीत यांनी मागेच 'बसणं' prefer... Continue Reading →

‘१०वी फ’ ची ट्रिप

"चला कुठेतरी फेरफटका मारून येऊ. दहावी फ ची एक तरी ट्रिप काढूना यार" मी उसाच्या रसाचा ग्लास टेबलावर ठेवत बोललो. "चालेल ना अरे मी तर कधी पासून म्हणतोय जाऊ कुठेतरी. मी ट्रेकिंगबद्दल पण बोललो होतो. कोणीच तयार नाही झालं" किरणच्या बोलण्याने मला त्याची किव आली. हा बिचारा 2017 च्या सप्टेंबर पासून trekking trekking करत होता... Continue Reading →

मिसळवार

          अचानक साखर झोपेतून जाग आली. 'किती वाजले असतील?'  'उशीर तर झाला नसेल ना?' या प्रश्नांनी काही क्षणांकरता डोक्यात गोंधळचं करून टाकला होता. पटकन वेळ पाहिली. आठ वाजून गेले होते. साखर झोपेतलं स्वप्न अर्धवट बाजूला ठेवलं आणि पटकन आवरायला सुरुवात केली.           ५ नोव्हेंबरचा रविवार मिसळचा बेत सोबत घेऊनच उजाडला. नेहमीप्रमाणे आम्ही तर, म्हणजेच निरंजन,... Continue Reading →

कुने फॉल्स – एका अनोळखी वाटेवरचा प्रवास (भाग – २)

चैतन्यच्या प्रश्नाला ‘कोणाला तरी विचारु एकदा’ असं उत्तर मिळालं. काही क्षण तिथेच थांबल्यानंतर एका गृहस्थाला चैतन्यने विचारलं, "काका कुने फॉल्स चा रस्ता कोणता आहे?" आम्ही ज्या दिशेने आधी जात होतो, त्याच दिशेला हात दाखवत ते म्हणाले, "इकडून सरळचं आहे रस्ता" " तरी किती वेळ लागेल?" " अजुन १०-१५ मिनीटे लागतील" त्या गृहस्थांनी उत्तर दिलं. "Thank you!"... Continue Reading →

कुने फॉल्स – एका अनोळखी वाटेवरचा प्रवास (भाग – १)

"ठरलं तर मग! जागा चांगली असेल तर जाऊ तिथेच." चैतन्य म्हणाला. "चांगली आहे जागा. मित्र जाऊन आलाय माझा." मी म्हणालो. "आणि नाहीच आवडली जागा तर सरळ पवना धरणाकडे जाऊ आणि मोकळी जागा बघुन क्रिकेट खेळु." मयुरने सुचवलं.            जागा होती खंडाळ्याजवळची कुने फॉल्स. खरतर आमच्यापैकी कोणीच तिथे आधी गेलं नव्हतं. माझ्या... Continue Reading →

ताम्हिणी – एक अनपेक्षित प्रवास

"एवढ्या वर्षानंतर भेटतोय आपण तर कुठेतरी जवळ फिरायला जाऊया सगळे" योगेश म्हणाला. "हो चालेल ना! प्रतिशिर्डी वगैरे जाऊ. जवळ पण आहे. २-३ तासात येऊ परत. काय म्हणतो गौरव?" किरणने विचारलं. मी तर तयारचं होतो, पण सगळ्यांनाच जमणार नव्हतं. कोणाला बाहेर जायचं होतं, कोणाचं project work होतं, कोणी आजारी होतं. "मी कुठेही यायला तयार आहे. तुम्ही... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑