परी

प्रसंग तसा फार जुना नाही. त्या दिवशी घरी पाहुणे येणार होते. त्यामुळे घरात तशी कामाची लगबगचं होती. सर्वजण कामात होते. मी पण कोथिंबीरी निवडत हातभार लावयचा प्रयत्न करत होतो. तेवढ्या दारावरची बेल वाजली. मी हॉल मधे बसलो होतो. निवडलेली कोथिंबीर किचनमधे ठेवायला गेलो. तोपर्यंत बाबांनी दरवाजा ऊघडला. पाहुणे आले. त्यांच्याबरोबर आली ती चार वर्षांची लहान... Continue Reading →

Wind of change

I was allocated to Engines Department during the internship. Very soon I started working on my project. Everyone in the office was very helpful from the first day. My mentor was a real leader, an enthusiast indeed. Everything was just going great. I was already excited! And then a couple of days followed, unfolded series... Continue Reading →

मिसळवार

          अचानक साखर झोपेतून जाग आली. 'किती वाजले असतील?'  'उशीर तर झाला नसेल ना?' या प्रश्नांनी काही क्षणांकरता डोक्यात गोंधळचं करून टाकला होता. पटकन वेळ पाहिली. आठ वाजून गेले होते. साखर झोपेतलं स्वप्न अर्धवट बाजूला ठेवलं आणि पटकन आवरायला सुरुवात केली.           ५ नोव्हेंबरचा रविवार मिसळचा बेत सोबत घेऊनच उजाडला. नेहमीप्रमाणे आम्ही तर, म्हणजेच निरंजन,... Continue Reading →

कुने फॉल्स – एका अनोळखी वाटेवरचा प्रवास (भाग – २)

चैतन्यच्या प्रश्नाला ‘कोणाला तरी विचारु एकदा’ असं उत्तर मिळालं. काही क्षण तिथेच थांबल्यानंतर एका गृहस्थाला चैतन्यने विचारलं, "काका कुने फॉल्स चा रस्ता कोणता आहे?" आम्ही ज्या दिशेने आधी जात होतो, त्याच दिशेला हात दाखवत ते म्हणाले, "इकडून सरळचं आहे रस्ता" " तरी किती वेळ लागेल?" " अजुन १०-१५ मिनीटे लागतील" त्या गृहस्थांनी उत्तर दिलं. "Thank you!"... Continue Reading →

कुने फॉल्स – एका अनोळखी वाटेवरचा प्रवास (भाग – १)

"ठरलं तर मग! जागा चांगली असेल तर जाऊ तिथेच." चैतन्य म्हणाला. "चांगली आहे जागा. मित्र जाऊन आलाय माझा." मी म्हणालो. "आणि नाहीच आवडली जागा तर सरळ पवना धरणाकडे जाऊ आणि मोकळी जागा बघुन क्रिकेट खेळु." मयुरने सुचवलं.            जागा होती खंडाळ्याजवळची कुने फॉल्स. खरतर आमच्यापैकी कोणीच तिथे आधी गेलं नव्हतं. माझ्या... Continue Reading →

ताम्हिणी – एक अनपेक्षित प्रवास

"एवढ्या वर्षानंतर भेटतोय आपण तर कुठेतरी जवळ फिरायला जाऊया सगळे" योगेश म्हणाला. "हो चालेल ना! प्रतिशिर्डी वगैरे जाऊ. जवळ पण आहे. २-३ तासात येऊ परत. काय म्हणतो गौरव?" किरणने विचारलं. मी तर तयारचं होतो, पण सगळ्यांनाच जमणार नव्हतं. कोणाला बाहेर जायचं होतं, कोणाचं project work होतं, कोणी आजारी होतं. "मी कुठेही यायला तयार आहे. तुम्ही... Continue Reading →

एक भेट – १३ वर्षांनंतरची

सकाळी लवकरच जाग आली. सुर्याची कोमळ किरणे खिडकीतुन डोकावत होती. आकाश अगदी निरभ्र होतं. ऐन पावसाळ्यात असं आकाश बऱ्याच दिवसानंतर बघायला मिळालं होतं. मी त्या मोहुन टाकणाऱ्या निळ्या आकाशाकडे बराच वेळ बघत बसलो. सकाळचं ते दृश्य खरंच नयनरम्य होतं. आवरायला जाण्याआधी पावसाची चिन्हे शोधायला एकवेळ आकाशावर दुरपर्यंत नजर फिरवली. कोठेच ढग दिसलेे नाहीत. मनाला समाधान... Continue Reading →

The office

It was quite cold when I reached H Block, might be due to trees on the either side of the road. The combination of morning sun heat and cold air was quite soothing though. After walking a bit, I went downstairs where Production office was located, near the facility of the engine assembly. Of course,... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑